Ad will apear here
Next
पुण्याच्या ओंकार मोदगीचा लघुपट एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये
ओंकार मोदगीपुणे : पुण्यातील पटकथालेखक व दिग्दर्शक ओंकार मोदगी याच्या ‘डोगमा’ या लघुचित्रपटाची लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी लॉस एंजिलिसमध्ये हा लघुचित्रपट दाखवला जाणार आहे.

या लघुचित्रपटाची गेल्या तीन महिन्यांत १८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवड झाली असून, मानाच्या तीन महोत्सवांत त्याला पारितोषिके मिळाली आहेत.

समाजातील तणावाचे आणि हिंसेचे वातावरण असताना, रात्रीच्या वेळी दोन व्यक्तींची एका निर्मनुष्य ठिकाणी भेट होते. या दोघांच्याही मनात असलेल्या एकमेकांबद्द्लच्या प्रतिमा आणि त्यातून घडणारे नाट्य ‘डोगमा’मध्ये दाखवण्यात आले आहे. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ओंकार मोदगी यानेच केले असून, ओंकार भस्मे आणि यशपाल सारनाथ यांनी त्यात भूमिका साकारल्या आहेत.

लॉस एंजेलिसमधील निवडीबरोबरच जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या बाराव्या जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीही हा लघुचित्रपट निवडला गेला आहे. या चित्रपट महोत्सवासाठी ९५ देशांमधून २१६१ चित्रपट, लघुचित्रपट व माहितीपट आले होते. यातून ५० तज्ज्ञ ज्यूरींनी २१९ चित्रपटांची निवड केली. त्यात ‘डोगमा’ने स्थान मिळवले आहे.

‘डोगमा या लघुचित्रपटाने मला लेखक आणि दिग्दर्शक म्हणून अधिक समृध्द केले. या चित्रपटास महोत्सवांमध्ये मिळणारा प्रतिसाद वाखाणण्याजोगा असून, लॉस एंजेलिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानाचे आहे,’ अशी भावना ओंकार मोदगी याने व्यक्त केली. 

यापूर्वी या चित्रपटास कोलकात्यात झालेल्या ‘मूडी क्रॅब फिल्म फेस्ट २०१९’ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘ऑडियन्स चॉईस अॅवॉर्ड’, पुण्यातील ‘ग्रेट मेसेज इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ आणि ‘नेक्सजेन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ज्यूरी पुरस्कार मिळाला आहे. केरळमधील त्रिसुर येथे होणाऱ्या ‘साईन्स’ या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चित्रपट महोत्सवात हा लघुचित्रपट ‘फोकस सेक्शन’मध्ये निवडला गेला होता. 

अमेरिकेत नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या ‘द शॉर्ट फिल्म अॅवॉर्डस’मध्ये ‘आऊटस्टँडिंग टेक्निकल वर्क’ या विभागात ‘डोगमा’ हा एकमेव भारतीय चित्रपट १००० चित्रपटांमधून अंतिम पाच चित्रपटांमध्ये निवडला गेला होता. तसेच कोलंबियातील ‘मेडेलिन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटाची स्पर्धात्मक विभागातील प्रदर्शनासाठी ६१ देशांतील ९५३ चित्रपटांमधून निवड झाली होती.   

युनायटेड किंग्डममधील युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट आँग्लियामधून ‘क्रिएटिव्ह रायटिंग’मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या ओंकारला इंटरनॅशनल एक्सलन्स शिष्यवृत्तीनेही सन्मानित करण्यात आले होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZRYCH
Similar Posts
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
इतिहास जिवंत होणार… मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील महत्त्वाचा लढा म्हणजे महाडचा सत्याग्रह. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावं यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. हा लढा फक्त पाण्यापुरता मर्यादित नव्हता तर ती सुरुवात होती मानवी मुलभूत हक्कांच्या चळवळीची. या घटनेनंतर समतेचे वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून वाहू लागले
कल्पनेला पडद्यावर साकारणारे ‘इल्युजन इथेरिअल’ पुणे : चित्रपटाच्या कथेची मांडणी, सादरीकरण याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आज व्हीएफएक्स, स्पेशल इफेक्ट्स अशा आधुनिक तंत्रज्ञानालासुद्धा आले आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक या आधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य देत असल्याचे दिसते. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या लाल कप्तान, हिरकणी, फत्तेशिकस्त या चित्रपटांच्या ‘व्हीएफएक्स’ची सर्वत्र मोठी चर्चा होती
‘फर्स्ट टेक’ स्पर्धेत पुण्याचे चारुदत्त पांडे विजेते अहमदाबाद : ‘फर्स्ट टेक’ या राष्ट्रीय पातळीवरील पेंटिंग, प्रिंट्स, सिरॅमिक व शिल्पकला क्षेत्रातील स्पर्धेत पुण्याच्या चारुदत्त पांडे यांनी पहिल्या दहा विजेत्यांमध्ये स्थान पटकावले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अंदाजे दोन हजार ३५० कलाकृतींपैकी १३० कलाकृतींची निवड प्रदर्शनासाठी करण्यात आली आणि त्यातून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language